Uddhav Thackeray, Mangesh Chavan .jpg
Uddhav Thackeray, Mangesh Chavan .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

पिताश्रींचे स्मारक सरकारी खर्चाने बांधणाऱ्यांनी राम मंदीर देणगीवर बोलू नये!

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : श्रीराम जन्मभूमी जमीन खरेदी घोटाळ्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. याच मुद्यावरून बुधवारी मुंबईमध्ये शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. त्यातच आता भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. (MLA Mangesh Chavan criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 

या संदर्भात मगेश चव्हाण यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ''प्रभू श्रीराम मंदिरासाठी लागणारी अतिरिक्त जागा राम मंदीर न्यासाने विकत घेतली, मोफत नाही. आपल्या पिताश्रींचे स्मारक सरकारी जागेवर व सरकारी खर्चाने बांधणाऱ्यांनी राम मंदिर देणगी वर बोलू नये.'' असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे नेहमीच आक्रमक असतात. गेल्या महिन्यात शेतकरी वीज बिल वाढ प्रश्नावर आंदोलन करून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना खुर्चीला बांधून ठेवले होते. या प्रकरणी त्यांना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या मुळे जळगाव जिल्ह्यात बराच वाद निर्माण झाला होता.  

दरम्यान, मुंबईत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. शिवसेना (ShivSena) भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे वाद झाल्याची माहिती मिळत आहे. या टीकेविरोधात शिवसेनाला फटकारण्यासाठी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाचे रुपांतर फटकेबाजीत झाले. हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. 

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेविरोधात भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन केले. शिवसेना भवनच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्या घोषणाबाजीचे रुपांतर नंतर तुफान हाणामारीत झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT